सासू वाईटच असते म्हणत चांगले नाते गमावून बसले असते

  • 10.6k
  • 3.2k

लग्नानंतर हा माझा पहिला वाढदिवस होता. नवऱ्याने तर मला खूप गिफ्ट्स दिले. संध्याकाळी आम्ही सगळे तयार होऊन बाहेर जेवायला जाणार तितक्यात सासूबाईंचा आवाज आला. त्यांनी नवऱ्याला बोलावले आणि म्हणाल्या "मी काही तुमच्यासोबत बाहेर येऊ शकणार नाही. माझा गुडघा खूप दुखत आहे. मी घरीच आराम करते तुम्ही सगळे जाऊन या." आईला घरी एकटे सोडून जाणे नवऱ्याला पटले नाही. त्याने बाहेरचा प्लॅनच कॅन्सल केला. घरी जेवण मागवले. माझा मूड खराब झाला. सासूचा गुडघा आजच दुखायचा होता का. माझ्या आयुष्यातले चार आनंदाचे क्षण तिला बघवतच नाहीत, असं म्हणून मी त्या दिवशी न जेवताच झोपून गेले. माझ्या मैत्रिणीने मला सासू किती खाष्ट असते हे