कोल्हापूरच्या भुदरगडावर झालेला साक्षात्कार..

  • 6.5k
  • 1
  • 2.3k

यावर्षी ५ जूनला भाऊचा बर्थडे म्हणून माझे सर्व मित्र मला भाऊ, तात्या, सरपंच, सरकार, अण्णा, रावडी भाऊ अशा नाना प्रकारच्या उपाधी देऊन गौरवित होते. मला त्यांच्या या प्रशंसेचे कारण सुद्धा समजले. माझ्या मित्रांना माझ्या वाढदिवशी तांबडा आणि पांढरा रस्साची पार्टी हवी होती. मी सुद्धा मोठ्या आनंदाने ती कबूल केली फक्त एक अट टाकून! की ५ जूनचा पूर्ण एक दिवस कोल्हापूर जवळील कोणत्याही एका गडाची आपण स्वच्छता करुया. तेव्हा ठरलं, कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर दूर असलेला भुदरगडावर निघायचे म्हणून. ५ तारखेला सकाळी ५ वाजता आम्ही सहा जण तीन गाड्या घेऊन निघालो. सोबत कोयते, फावडी, घमेली असं विविध साहित्य होते. सकाळी बरोबर सव्वा