चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 14

  • 4.3k
  • 2k

भाग -14 रेवतीनगरच्या दिशेने ज्या रात्री चंद्रा व वाघ्या निघून गेले होटे त्याच्या दुसऱ्या दिवशी चंद्रा नाही हे बघून साऱ्यांचे धाबे दणाणले.आपली जुनी होडी नाही हे सरजूच्या लक्षात आले.चंद्रा होडी घेऊन समुद्रावर गेला होता हे निश्चित. चंदेलच्या किनाऱ्यावरून सात आठ होड्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या.दिवसभर शोध घेऊनही त्यांना चंद्राचा माग लागला नाही.सतत दोन दिवस ते शोध घेत होते. सरजू चिंतेत पडला होता.या अफाट दर्यावर क्षणाक्षणाला नवीन संकटे समोर येत असतात.त्यांना चंद्रसारखा मुलगा तोंड देऊ शकेल का? हा प्रश्न सरजूला पडला होता.खर म्हणजे चंद्रा सरजूच्या तालिमीत तयार झाला होता व सहजासहजी डगमणारा नव्हता हे साऱ्यांना माहीत होते.पण तो नेमका कुठे व का