"अति तिथे माती "ही म्हण आपण लहानपणाासून शाळेत ऐकत आलेलो आहोत, ही म्हण मी डॉक्टर झाल्यावर मला पेशंटचे गैरसमज दूर करण्यासाठी उपयोगी पडेल असं वाटलं नव्हतं..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधी करू नये . हा नियम जसा वाईट गोष्टींना लागू होतो तसाच काही चांगल्या गोष्टींनाही लागू होतो.. याच अनुषंगाने ,आज मी तुम्हाला स्वच्छता , नाही नाही अति स्वच्छता तीही स्त्रीच्या योनीची कशी घातक ठरू शकते याबद्दल थोडसं सांगणार आहे... नवीनच लग्न झालेली माझी एक पेशंट..मॅडम.. माझ्या लघवीच्या जागी फोड आले आहेत आणि खूप दुखतय तिथं.. काहीतरी औषध द्या.. दुखणं सहन होत नाहीये..मी तिला काही जुजबी प्रश्न विचारले.. त्यातून मला समजलं, की तिने