साक्षीदार - 7

  • 7.9k
  • 3.9k

साक्षीदार प्रकरण ७ पाणिनी पटवर्धन गाढ झोपलेला असताना त्याचा लँड लाईन फोन वाजला. फोनवर ईशा अरोरा बोलत होती “,थँक्स तुम्ही फोन उचलला मी ईशा बोलते आहे तुम्ही ताबडतोब गाडीत बसा आणि या” ती म्हणाली. पाणिनी पटवर्धन चा आवाज एकदम झोपाळलेल्या आला.“या म्हणजे कुठे या ?आणि काय झालं एकदम?” पाणिनी ने विचारलं“अहो काहीतरी भयानक घडलंय.” ती म्हणाली. “आणि ऐका घरी येऊ नका मी घरी नाहीये.” “मग कुठे आहात तुम्ही?”“ मी कोपऱ्यावरच्या एका औषधाच्या दुकानात आहे तुम्हाला तिथे मोठे फ्लड लाईट लागलेले दिसतील औषधाच्या दुकानात. तिथं मी त्याच्या समोरच उभी आहे” ती म्हणाली.“ ऐकून घे, मी यापूर्वी असे रात्रीचे फोन अनेक वेळा