ते चार दिवस - भाग 4

  • 6.4k
  • 2.3k

ते चार दिवस 28 डिसेंबर 2020 वेळ-सकाळी 4.30 स्थळ- अलिबाग इन्स्पेक्टर खान सगळ्यांना चंद्रिकेच्या सुटकेचा प्लान समजावून सांगत होता.त्याने यापूर्वी दोन वेळा समीरने ड्रोनद्वारे तयार केलेले फार्महाऊसचे शूटिंग बघितले होते. तसेच प्रशांतने गुगलमॅपवरून तयार केलेले ड्राॅइंग त्याने अभ्यासाले होते.त्याच्या डोक्यात प्लान तयार होता. बंगला साधारण मध्यावर होता.बंगल्याच्या उजव्या बाजूला राजमानेची औषधाची छोटी फॅक्टरी होती. बंगल्याच्या पुढच्या बाजूला गेट होते व ते सतत बंद असायचे.पुढच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला डॉबरमॅन कुत्रे बसलेले असत. चंद्रिका पहिल्या मजल्यावरच्या किनार्यालगतच्या खोलीत होती.त्यावर गच्ची होती. सभोवताली माड व पोफळींची दाटी होती. सभोवतालच्या दगडी कुंपणावर दोन फुट उंचीचे तारेचे कुंपण होते. त्यातून इलेक्ट्रिक करंट सोडलेला होता. बंगल्याच्या