साक्षीदार - 9

  • 7.5k
  • 3.9k

प्रकरण ९ पाणिनी च्या फोन नंतर थोड्याच वेळात, इन्स्पेक्टर हर्डीकर अरोरा च्या घरात हजर झाला होतं आणि त्याने प्राथमिक तपासणी पूर्ण करून घेतली होती. “ आम्हाला जी कागदपत्र मिळाली आहेत त्या नुसार अरोरा हा मिर्च मसाला या ब्लॅकमेल करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पेपर चा मालक होता,मिस्टर पटवर्धन. ” तो पाणिनी ला म्हणाला. “ मला माहीत होत ते.” पाणिनी म्हणाला. “ कधी पासून माहिती होत हे तुम्हाला?” “ अत्ता एवढ्यातच.” पाणिनी म्हणाला “ तुम्हाला समजलं कसं पण हे?” “ ते मात्र मला सांगता येणार नाही.”. पाणिनी म्हणाला “ पोलिसांच्या आधी तुम्ही कसे आलात घरी?”-हर्डीकर “ तुम्ही ईशा ने काय सांगितलं ते ऐकलय