स्ट्रगल - भाग-3

  • 6.6k
  • 3.1k

दुसऱ्या दिवशी सकाळी....वेळ 7 वाजताची...विक्रमच्या खोलीत...विक्रम नुकताच उठलेला होता. आणि आपल आवरून गजानन महाराजांची पोथी वाचत होता. तेवढ्यात त्याला भेटायला खोलीत दुर्गाबाई येतात."येऊ का खोलीत? (दार उघडत), पोथी वाचतोय व्हय. चालू दे चालू दे मी नंतर येते."दुर्गाबाई बोलून निघणारच असतात तेवढ्यात पोथी ठेवत विक्रम बोलतो."आजी अहो, थांबा की काही काम होत का? या न झालीच आहे माझी पोथी. ते काय आहे ना लहानपणा पासूनची सवय आहे पोथी वाचण्याची बोला काय म्हणता."पोथीला नमस्कार करून पोथी जागेवर ठेवत विक्रम विचारतो.तेवढ्यात दुर्गाबाई खोलीत येऊन पलंगावर बसत बोलू लागतात.(खोलीवरून नजर फिरवत) "बाकी खोली छान ठेवली आहेस बर का ही पण लहानपणा पासून ची सवय