खेळ जीवन-मरणाचा - 2

  • 6k
  • 3.4k

खेळ ?जीवन -मरणाचा (भाग -2) सुलेमान करोल या नावाचा दबदबा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये गेल्या पंधरावर्षापासून निर्माण झाला होता. 'सनकी' या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला सुलेमान अत्यंत क्रूर होता. अपहरण.....खून....अमली पदार्थांची तस्करी...खंडणीवसूली असे नाना उद्योग त्याने केले होते.त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.आज करोडोंच्या संप्पत्तीचा मालक असलेल्या सुलेमानच्या गुन्हेगारीच जाळ भारतातल्या प्रमुख शहरात पसरलं होत. त्याच्याशी विश्वासघात करणार्या लोकांच्या हातांची बोट तो तोडून टाकत असे.रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत विव्हळणार्या माणसांना बघून आनंदाने खदाखदाखदा हसत बसणे हा त्याचा आवडता खेळ होता. तो मूळचा हैद्राबाद मधला.बालपणात त्याला खूप हाल अन वेदना सोसाव्या लागल्या होत्या . त्याचा बाप हैद्राबाद मधला नामवंत उद्योगपती ...अतिशय थंड डोक्याचा...धंद्याच्या निमित्ताने त्याने