नंदिनी

  • 7.9k
  • 1
  • 2.9k

न्यूज मध्ये बातमी चालत होती, मुंबई-पुणे हायवेवर महाविद्यालयीन बसचा एक्सीडेंट झालेला आहे, बऱ्याच मुलींना गंभीर इजा झालेले आहे, ही बातमी ऐकताच नंदिनीच्या आई-वडिलांचा थरकाप होऊ लागला. त्यांनी पटकन नंदिनीच्या मोबाईल वरती कॉल केला, पण समोरून कॉल कोणी उचलत नव्हतं. त्यानी घाबरत, घाबरत त्यांच्या मोठ्या मुलीला फोन लावलं. तिचे नाव वेदिका, वेदिका म्हणाली आई मी पण आत्ताच बातमी ऐकली. मला पण काही सुचत नाही मी यांना लगेच फोन लावते, आणि माहिती काढायला सांगते. पाच मिनिटांनी नंदिनीच्या वडिलांच्या मोबाईलवर कॉल आला