खेळ जीवन-मरणाचा - 4

  • 4.7k
  • 2.3k

खेळ ? जीवन -मरणाचा अमित व शायना बराच काळ चालत होती. चालून चालून दोघांचे पाय दुखत होते.तहान लागली होती.अगदी थोडेच पाणी शिल्लक होत ....ते जपून वापरावं लागत होत.वाटेत कुठंही गोड्या पाण्याचा झरा किंवा डबकं दिसल नव्हते. आपण कुणाच्या नजरेत येवू नये म्हणून ती दोघ झाडीतून चालत होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हत. ती दोघ टेकडीच्या पायथ्याशी पोहचली तेव्हा सूर्य अस्ताला गेला होता.काळोख होण्याअगोदर आसरा शोधावा लागणार होता.अमितने एखादी सुरक्षित जागा मिळते काय ते शोधायला सुरूवात केली.शायना तीर कामठा बाजूला ठेवून झाडाला टेकून बसली. "अग. एखादा आसरा मिळतो काय ते बघ. नुसतं बसून काय होणार?" "हे बघ मला काही फरक पडत नाही.