खंड्याच शिकण

  • 23.5k
  • 1
  • 7.4k

खंडयाच शिकणओढ्यालगतच्या चिंचेच्या झाडावर खंड्या पक्षी बसला होता.ध्यानमग्न साधुसारखा झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याकडे एकटक बघत होता.त्या पाण्यातून वेगाने पळणाऱ्या चंदेरी- सोनेरी माश्यांवर त्याचे लक्ष होते.आपल शरीर ताणत तो झेप घेण्याच्या तयारीत होता.तेवढ्यात पलिकडच्या झाडीतून कोतवाल पक्षीची जोडी कर्कश आवाज करत उंच उडाली.त्यांच्या ओरडण्याने खंड्याचे लक्ष विचलित झाले.काहीतरी धोक्याची सूचना कोतवाल पक्षी देत होते.समोरच्या घळणीवर लटकात्या मुळांच्या आडोश्याला त्याच घर (बिळ) होत.त्यात त्याच छोट पिलू होत.त्याची पत्नीही शिकारीसाठी बाहेर गेली होती. खंड्यान आपल्या घरच्या दिशेने पाहिलं. तो दचकला.एक भला मोठा पिवळाधमक सांप सरसरत त्याच्या घराच्या दिशेने जात होता.अगदी क्षणातच तो सांप बिळात शिरणार होता.संतापाने खंड्याचे डोळे गरागरा फिरायला लागले. पंखात सार बळ