तांडव - भाग 1

  • 8.8k
  • 1
  • 4.2k

तांडव- भाग-1 मी चहाचा घोट घेता- घेता वर्तमानपत्र वाचत होतो.वाफाळणारा चहा व सकाळच प्रसन्न वातावरण यामुळे मी मूडमध्ये होतो. अचानक एका बातमीने माझे लक्ष वेधले...बातमी अशी होती. सलग तिसरी रहस्यमय हत्या तळगांव- दि.५/२/२०२१ आज पहाटे तळगाव घाटीतील शेवटच्या वळणार एक मृतदेह आढळून आलाय.दूध घेवून येणार्या टेम्पोचालकाने घाटात भररस्त्यात पडलेला हा मृतदेह पाहिला व पोलीसांना खबर दिली. मृतदेह तरूणाचा असून मृतदेहाचा चेहरा अत्यंत क्रूरपणे विद्रूप केलेला आहे.त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले आहे. गेल्या महिनाभरात तळगांव परीसरात झालेली ही तिसरी हत्या असून आधिच्या दोन हत्यांप्रमाणेच याही वेळा पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनांमुळे तळगाव परीसरात भितीच वातावरण पसरलं