राष्ट्रवाद: एक नवी प्रणाली

  • 6.2k
  • 2.1k

         राष्ट्रवाद ही मानवांची मानसिक आणि भावनिक संकल्पना आहे. राष्ट्रवाद ही अत्यंत गुंतागुतीची संकल्पना आहे. राष्ट्र या शब्दाशी राष्ट्रवाद ही संकल्पना संबंधित आहे. राश्ट्र या शब्दापासूनच राष्ट्रवाद या संकल्पनेचा जन्म झाला आहे. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणे आणि राष्ट्रांशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टींचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे. राष्ट्र आणि नागरिकांच्या कल्याणासाठी राष्ट्रवादाचे मानसिक आणि भावनिक बळ घेऊन राष्ट्रांचे नागरिक काही तरी करण्याची धडपड करीत असणे म्हणजेच राष्ट्रवाद असतो.          राष्ट्रवादाचा जन्म हा जागरूक नागरिकांच्या मनामध्ये होत असतो; तसेच राष्ट्रवादाच्या राष्ट्रीय भावनेतून ऐकामकांविषयी आपुलकीची भावना निर्माण होत असते. राष्ट्रवादामुळे राष्ट्र आणि मानवकल्याणासाठी नागरिक नैतिक उच्चकोटीचे त्याग