साक्षीदार - 14

  • 6.8k
  • 3.4k

साक्षीदार प्रकरण १४ फिरोज लोकवाला त्याच्या ऑफिस मधे बसला होता.पाणिनी पटवर्धन त्याच्या समोर होता “ ते तुला शोधताहेत.” फिरोज म्हणाला. पाणिनी चा चेहेरा बिनधास्त होता. “ ते म्हणजे कोण?” “ बरेच जण., पत्रकार, पोलीस, वगैरे.” “ सगळ्यांना भेटलोय मी.” पाणिनी म्हणाला “ आज दुपारी?” फिरोजने विचारलं “ नाही काल रात्री.” पाणिनी म्हणाला. “ का बरं?” “ नाही सहजच. मला वाटतंय आता तू त्यांना वेगळ्या भूमिकेतून हवा आहेस. असो. तू कशाला आलायस इथे?” -- फिरोज “ एवढंच सांगायला आलो होतो की ईशा अरोरा ने तिच्या नवऱ्याच्या मालमत्तेचा प्रशासक म्हणून तिला नेमले जावे यासाठी कोर्टात अर्ज केलाय.” पाणिनी म्हणाला “ असेल.मला काय