रात्र खेळीते खेळ - भाग 1

  • 25k
  • 1
  • 16.8k

सदर कथा ही पूर्णतः हा काल्पनिक आहे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी....आई ग...... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला. समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट जंगलच जंगल होत त्याला काहीच आठवेना कि आपण नेमक कोठे आलो आहोत. तो याचा विचार करतच होता कि जंगलातून अनेक श्वापदांचे आवाज येवू लागले. ते ऐकून तर त्याच्या अंगावर सर्रकन काटाच आला.त्याला वाटल आता आपल काही खर नाही आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याला आज एक एक क्षण घालवण सुद्धा कठीण झाल होत. आणि मुळात त्याला आपण इथे कस आलो हेच आठवत नव्हत. तोपर्यंत त्याला अस जाणवू