अगा जे घडलेचि आहे! - 4 - अंतिम भाग

  • 5.6k
  • 2.1k

४. अवि पुढे बरेच काही बोलला. माझी कथा इथेच संपायला हवी. पुढे घडण्यासारखे काय होते या गोष्टीत? पण नाही. हिंदी सिनेमाचा उसूल आहे. त्यात हॅपी एंड व्हायलाच हवा! सारी गोष्ट त्यासाठी कितीही वळसे खात असली तरी चालते त्या गोष्टीत! हीरोला हीरॉईन मिळायलाच पाहिजे. शेवटच्या सीन मध्ये त्यांनी एकाच गाडीतून कुठे जायलाच पाहिजे आणि 'द न्यू बिगिनींग' वर 'द एंड' व्हायला पाहिजे. आणि या गोष्टीचा हीरो मी आहे! तेव्हा सुखांत व्हायलाच हवा! मी म्हटले ना जे घडते तेच दिसते सिनेमात. अशा गोष्टीचा अंत सुखांत होत असेल तर तसाच तो सिनेमात दिसणार नाही का? पुढे माझे जुळले ते बटाटेवडेवालीशीच! आणि ते ही