बदलणारे चेहरे! - 2

  • 7.5k
  • 3.3k

भाग - ०२. "कोण आहे?" तिने भेदरलेल्या आवाजाने प्रश्न केला. "Jennie, मी आहे. दार उघड." "Wait, मी चेंज करतेय." तिने अंगावर कपडे चढवले आणि दार उघडले. बाहेर तिची मैत्रीण नाश्त्याची प्लेट घेऊन उभी होती. "घे काही खाऊन घे. नंतर पालखी रसम होईपर्यंत जेवण मिळणार नाही." "श्रेया, ही पालखी रसम काय असते?" "आमच्या गावात लग्नावेळी पालखी रसमचे खूप महत्व आहे. त्याशिवाय लग्नच लावत नाहीत." "असे काय आहे या रसम मध्ये?" "काय आहे मला माहीत नाही! पण माझ्यासमोर एकदा एका नवरीने या रसमचा विरोध केला होता. तेव्हा पूर्ण गावाला याची शिक्षा भोगावी लागली होती. पूर्ण गावात लग्न जुळलेल्या मुलींना जीव गमवावा लागला