नाचं ग घुमा ( पुस्तक परीक्षण)

  • 20.9k
  • 5.4k

पुस्तकाचं नाव : नाच गं घुमा लेखिका : माधवी देसाई प्रकाशन : इंद्रायणी साहित्य पुस्तक परिचय : डॉ. स्वाती अनिल मोरे आता गळ्यात सौभाग्य अलंकार नसतो, पण कपाळावर लालभडक कुंकू असतं....ती निशाणी असते माझ्या प्रिय हिंदू धर्माची!अनेक रूपांत बदलत गेलेल्याभारतीय स्त्री जीवनाची!ती कपाळावरची रक्तरंजीत खूण असते!मी भोगलेल्या वेदनेची, शोकाची, सुखाची आणि मोहाचीही!मोहाच्या फुलांचा रंग लालच असावा...बहुधा.... .................. माधवी देसाई... श्री. भालजी पेंढारकर यांची कन्या आणि श्री. नरेंद्र काटकर यांची पहिली आणि श्री.रणजीत देसाई यांची दुसरी पत्नी!!तिचं बालपण कोल्हापुरातील तपोवनात एकदम शिस्तीत आणि साधेपणात गेलं...चांगलं स्थळ आलं म्हणून लग्नही जरा लवकरच झालं... लग्न करून सुखी संसाराची स्वप्न तिनेही बघितली...कोल्हापुरात वाढलेली ती...