बायको माझी प्रेमाची! - 1

  • 22.5k
  • 14.9k

१) नवरा- बायको अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि तितकेच नाजूक नाते! व्यक्त- अव्यक्त प्रेमाची एक घट्ट वीण असलेले नाते. रुसवेफुगवे, हसणे-खेळणे, वादविवाद, सुसंवाद, लटका राग, प्रसंगी संताप, चिडचिड इत्यादी अनेक भावभावनांचे पदर गुंफलेले नाते म्हणजे पतीपत्नी! दोघेही एकमेकांची हौसमौज, आवड-निवड जपताना, काळजी आणि चिंता वाहताना एकमेकांना सांभाळून घेण्याचा वसा घेतलेले आणि जीवापाड जपणारे असे नाते म्हणजे पतीपत्नी! अशाच एका नवराबायकोच्या आगळ्यावेगळ्या प्रेमाची गोष्ट एका नवऱ्याच्या तोंडूनच ऐकूया... त्यादिवशी सकाळी मी झक्कास आळस देऊन उठलो. समाधानाची एक अनुभूती शरीरात संचारली असताना मला काही तरी आठवले आणि माझे लक्ष समोरच्या घड्याळावर गेले. 'बाप रे! आठ वाजून गेले. किती वेळ झोपलो मी? जाग कशी