बायको माझी प्रेमाची! - 2

  • 9.5k
  • 4.7k

२) 'चला एक युध्द तर जिंकले. फराळाची व्यवस्था झाली.' असे मी मनाशीच बोलत असताना माझ्या एक दिवसीय बायकोचे म्हणजे सरोजचे आगमन झाले. तिला पाहताच मला एकदम शिसारीच आल्यागत झाले. कारण ती ब्रश करीत आली होती. तिच्या ओठांच्या दोन्ही कडांमधून पेस्टचा फेस पाण्यासारख्या वाहत होता. शीला केव्हा ब्रश करायची, स्नान करायची हे मला कधी समजलेच नाही कारण त्यावेळी मी कुंभकर्णी झोपेत असे. शीलाला स्नान करतानाच्या किंवा ओलेत्या अवस्थेत पाहण्याची इच्छा मनात असूनही तो योग कधीच आला नाही. इकडे सरोज त्याच अवस्थेत फतकल मारून सोफ्यावर बसून विचारत होती, "ये-ये-च-च-हा--फ-रा-ल....." तितक्यात तिच्या तोंडातली खूपशी घाण गाऊनवर पडली. हाताने ती घाण साफ करीत ती