देव जागा आहे... - 1

  • 10k
  • 4.5k

भाग १ दुपार च कडक उन्ह.गाडीत एसी सुरू असून ही अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या त्यात मुंबई च ट्रॅफिक जाम..सुजल रुमालाने घाम पुसून पुसून वैतागून गेला होता. इतक्यात गाडीच्या काचेवर टकटक ऐकू आली.सुजल ने गाडीची काच थोडी खाली घेतली तर एक बारा, तेरा वर्षाचा मुलगा हातात प्लॅस्टिक चे बॉल घेऊन उभा होता. त्याचे कपडे थोडे मळकट दिसत होते. केस विस्कटून कपाळावर आले होते.घामा चे हलके हलके थेंब त्याच्या कपाळावर दिसून येत होते. " दादा एक बॉल घ्या ना.." तो मुलगा कपाळावरचा घाम आपल्या शर्टच्या बाही ने पुसत हातातला बॉल सुजल पुढे करत बोलला. " नको...पुढे जा " सुजल ने एक