शापित फूल

(14)
  • 34k
  • 2
  • 11.1k

गोदावरी नावाची आदिवासी मुलगी सहा किलोमीटरचा प्रवास पायी करत नजिकच्या गावातल्या मुलींच्या शाळेत जायची.रस्ता खडतर होता. गर्द वनराईतून जाणारी पायवाट. वाटेत दोन ओढे लागत. त्यांच्या खळखळत्या पाण्यातून वाट काढत ती जायची.कधी वाटेत गवेरेडे ,रानडुक्कर दिसत. विविध पक्षी झाडांवर बागडताना दिसत. पाखरांचे आवाज,खळखळत्या पाण्याचा आवाज---झाडांच्या व वेळूंच्या बनात घुमणारी शीळ ती कानी साठवून ठेवी. कधी -कधी तोंडाने आवाज काढून ती पाखरांना साद घाली. तिच्यासाठी तो विरंगुळा होता. आदिवासी पाड्यातून ती एकटीच शाळेत जायची. त्यामुळे आपला एकटेपणा घालवण्यासाठी तिने हा छंद जोपासला होता. तिला अवघा निसर्ग आपला वाटायचा. सुट्टीच्या दिवसात ती आई सोबत कंदमुळे,औषधी वनस्पती गोळा करायला जायची. वस्तू गोळा करताना तिच