कंस मज बाळाची - भाग ४

  • 6.7k
  • 3.6k

आंस मज बाळाची भाग ४मागील भागावरून पुढे…आईचं ऐकून आपण कंटाळा न करता सगळ्या तपासण्या करायच्या कितीही वेळ लागू दे. वैभव आपल्या बरोबर आहे ही किती महत्वाची गोष्ट आहे. पोहे होताच तिनी पोळ्या केल्या आणि मग कुकर लावला. आता अनघाचं मन जरा शांत झालं.तिचं मन शांत झालं तसा तिचा चेहराही शांत दिसू लागला.अनघा विचारात इतकी गढली होती कि नाश्ता आणि वैभवचा डबा दोन्ही कधी तयार झालं हे तिच्याच लक्षात आलं नाही. तिला कळलं तेव्हा पुन्हा ती स्वत:शीच खुदकन हसली. माणसाचं मन विचारात गुंतलं की किती यांत्रिकपणे आपल्यासमोरची कामं करतो कळतही नाही. वैभवाचा डबा भरून ठेवला.अनाघानी समोर डायनिंग टेबलावर पोह्याची कढई आणून