कंस मज बाळाची - भाग ५

  • 6.7k
  • 3.6k

'आसं मज बाळाची' भाग ५मागील भागावरून पुढे..वैभव सकाळी ऑफीसला जाण्याची तयारी करत असतांनाच त्याच्या आईचा फोन आला. तयारी करता-करता फोन स्पीकरवर ठेवून तो बोलू लागला."हं आई बोलं.""काय बोलणार? बोलायला काही बाकी ठेवलस?"असं का म्हणतेस आई? मला कळलं नाही." वैभवनी गोंधळून विचारलं."कसं कळणार. काल आपल्या बाबांशी बोललास. आई तुझी कोणीच नाही. हो नं?"अग असं का म्हणतेस? रात्र खूप झाली होती म्हणून बाबांना सांगितलं तुला आज सविस्तर फोन करणार होतो. बाबांनी तुला सांगितलं असेल नं?""हो सांगितलं. किती खर्च येणार आहे या उपचारांना ?अजून माहित नाही. ही शस्त्रक्रिया करायची ठरवली की ते सांगतील. बीजांड देऊ शकेल अशी स्त्री पण शोधायची आहे.""वेड लागलाय तुला.