कंस मज बाळाची - भाग ७

  • 6.6k
  • 3.5k

आंस मज बाळाची भाग ७मागील भागावरून पुढे…रात्री सगळ्यांची जेवणी आटोपल्यावर ताई मुलांना म्हणाली "थोडं थांबा मला तुमच्याशी काही बोलायचं."आनंद आणि निनादला आश्चर्य वाटलं आई कधीच अशी प्रस्तावना करून बोलत नाही. जे बोलायचं आहे ते धड-धड बोलून मोकळी होते आज काय एवढं महत्वाचं आहे. दोघांनी मुकुंदरावांकडे बघून मानेनीच काय असं विचारलं. त्यांनी मानेनीच माहित नाही असं उत्तर दिलं. तिघही समोरच्या खोलीत येऊन बसले. स्वयंपाकघरातील मागचं आवरून ताईही समोरच्या खोलीत आली.तिघही ताईकडे उत्सुकतेनी बघत होते. ताईनी बोलायला सुरवात केली. "अनघा बाळासाठी उपचार घेते आहे हे तुम्हाला माहिती आहेच."तिघांनी होकारार्थी माना डोलावल्या. आता तिला जो उपचार सांगितला आहे तो जरा जास्त खर्चिक आहे.