कंस मज बाळाची - भाग ९

  • 6.6k
  • 3.2k

आंस मज बाळाची भाग ९मागील भागावरून पुढे…आसं मज बाळाची भाग ९संध्याकाळी ताई आणि मुकुंदराव डॉ. मेहतांच्या दवाखान्यात आले होते. आपला नंबर येईपर्यंत वाट बघत बसले होते. जवळपास अर्धा तास झाला होता त्यांना येऊन. एवढ्यात त्यांचं नाव पुकारल्या गेलं. "ममता मुकुंदराव कोल्हटकर कोण आहे?" ममता गडबडीनं उभी राहिली आणि म्हणाली,"मी आहे". "आत जा." रीसेप्शानिस्ट बोलली. दोघाही आत गेले."नमस्कार डॉ. मी ममता कोल्हाटकर""नमस्कार बसा."डॉ. म्हणाले. "डॉ. मी आपले पेशंट असलेल्या वैभव पांगारकर यांची मोठी बहीण. ""अच्छा." डाॅक्टर बोलले."मी माझं बीजांड माझ्या वहिनीला द्यायला तयार आहे."तिचं बोलण मधेच तोडत मुकुंदरावांनी बोलण्याची सूत्र आपल्याकडे घेतली."डॉ. ममताला तिचं बीजांड द्यायचं आहे पण हे मोठ ऑपारेशन