तिचं सो कॉल्ड स्वातंत्र्य... - 2

  • 6.7k
  • 3.2k

पण आता मी जो मुद्दा मांडणार आहे.. तो खूप नाजूक पण वास्तवाशी निगडित आहे.. स्त्रीची लैंगिक कुचंबणा..मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे अशा कितीतरी स्त्री पेशंट मी बघते. ज्यातल्या काही अकाली विधवा झाल्या आहेत, काही जणींना त्यांचा नवरा तिला हवे तसे लैंगिक सुख देऊ शकत नाही किंवा काहींचे नवरे कामासाठी वर्षानुवर्ष आपल्या पत्नी पासून दूर रहात असतात..अशा स्त्रियांना आहे का स्वातंत्र्य त्यांचं लैंगिक समाधान मिळवण्याचं ?.. नवऱ्याचे अकाली झालेले निधन , सासू सासऱ्यांची अचानक अंगावर आलेली जबाबदारी,मुलंबाळं, नातेवाईक...ही सगळी कर्तव्य ती विनातक्रार पार पाडत असेल . पण तिला नाही का लैंगिक सुख मिळवण्याचा हक्क ? "कशाला हवे आहे दुसरं लग्न, मुलं