निर्णय - भाग २

  • 10.1k
  • 6.7k

निर्णय भाग२मागील भागावरून पुढे…मंगेश घरातला पहिला मुलगा म्हणून खूप लाडाचा होता. या लाडामुळेच त्यांच्यात हट्टीपणा आला. मी म्हणीन ती पूर्व दिशा असं तो वागू लागला. कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. नोकरीसाठी मुलाखत तोच घ्यायचा यात तो त्याची इच्छा थोडी पुर्ण करीत असे.नियुक्त केलेल्या मुलींचा गैरफायदा अगदी निर्लज्जपणे घेत असे.हे सगळं इंदीरेला पटत नव्हतं पण मुलांकडे बघून ती गप्प बसत असे. रोज घरात भांडणं होऊन घरातलं वातावरण बिघडवण्याची इंदीरेला अजीबात इच्छा नव्हती. मुलांच्या दृष्टीनं तिनी हे शांत राहण्याचा पाऊल उचललं होतं. मुलं कधी कधी फार चिडत.वडलांच्या विचीत्र वागण्यानी,नको तेवढ्या शिस्तीनी मुलं कंटाळली होती. त्यांना स्वतंत्रपणे वागण्याची मुभा नव्हती." आई तू बाबांना काहीच