निर्णय - भाग ५

  • 8.4k
  • 4.6k

निर्णय भाग५मागील भागावरून पुढे…मिहीर ने एकदा वेळ बघून शुभांगीला विचारलं. तिनी विचार करायला वेळ मागीतला. नंतर मिहीरचा इंदीरेला फोन आला." आई मी शुभांगीला विचारलं. तिनी वेळ मागीतला आहे विचार करायला."" तिचं बरोबर आहे.आता तिनी काही सांगेपर्यंत तिला विचारु नकोस. एका दिवसात किंवा काही क्षणात लग्नाचा निर्णय घेता येत नाही.तू तिला सुरवातीपासून त्याच नजरेनी बघतो आहेस.तुला तिच्या बद्दल बरीच माहिती आहे पण तुझ्या मनात काय आहे हे तिला आत्ता कळलं आहे.तुझ्या मनात असं काही आहे याचा अंदाज बहुदा तिला आधी आला असेल.मुलींच्या लक्षात येतं.त्यामुळे तिला स्वतःहून विचारू नकोस."" ठीक आहे." मिहीरने फोन ठेवला.इंदीरा फोन ठेवून मागच्या अंगणातील बगीच्यात जायला वळली तसं