निर्णय - भाग ६

  • 6.3k
  • 3.3k

निर्णय भाग ६मागील भागावरून पुढे" आई मी शुभांगीला काय सांगू?" मिहीरचा आवाज रडवेला झाला होता." बाबांबद्दल खरं सांगायचं. ती आपल्या घरात येणार आहे तिला सगळ्यांबद्दल नीट माहिती हवी."" आई हे सगळं ऐकून तिनी नाही म्हटलं तर!"" नाही कशी म्हणेल एकदम. ती विचार करेल. तू तिला पसंत असशील तर इतर गोष्टीसाठी ती तडजोड करेल."" आई तुला माहिती होतं का ग लग्नाआधी बाबा असे आहेत हे?"" नाही.आमचा प्रेम विवाह नव्हता. ठरवून लग्न करताना मुलीला विचारण्याऐवजी मुलांच्या आजूबाजूची चौकशी करून मुलीचं लग्न लावून हीच पद्धत पूर्वापार चालत आली आहे. मुलाला चांगली नोकरी आहे,स्वतःचं घर आहे, मोठ्ठं कुटुंब आहे, हसतं खातं आहे एवढंच बघतात.आता