बावरा मन - 13 - Your time has begun.....

  • 9.1k
  • 4.4k

तिलकला पाच दिवस बाकी होते... उद्या रक्षाबंधन असल्याने सर्वजण आज जयपुर जाणार होते... रिद्धी सगळ्यांना भेटायला त्यांच्या घरी आली होती... सीमा खाली हॉलची क्लिनिंग करत होत्या... " कुठे आहेत सर्वजण..." रिद्धी " सगळे जण खोलीत आहेत... तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते..." सीमा " नाही नको मला काही... तुमच चालू देत..." रिद्धी वंशच्या रूमकडे जाते... रिद्धी रूममध्ये आली तर तो तिथे नव्हता... तिने सर्व रूम चेक केल्या... बेडच्या साईडला बॅग उभी होती... कपडे घड्या करून बेडवर ठेवले होते... तिला काहीतरी क्लिक झालं तशी ती फ्लोअरच्या गार्डन एरिया मध्ये आली... तिथून आत गेल्यानंतर जीम होती... तिचा अंदाज बरोबर निघाला