निर्णय - भाग १२

  • 7.3k
  • 3.7k

निर्णय भाग १२मागील भागावरून पुढे…म्हणता म्हणता मिहीरच्या लग्नाचा दिवस येऊन ठेपला.सगळी तयारी झाली असली तरी शेवटी धावपळ ऊडतेच तसंच इंदिरेचं पण झालं.शरदनी मुलीकडच्यांना कार्यालयाचा, जेवणाचा, बसचा खर्च विचारून अर्धे पैसे शुभांगीच्या बाबांना पाठवले होते.इंदिरेने हे शुभांगीच्या आईवडिलांना आधीच स्पष्ट केले होते. लग्नाचा पूर्ण खर्च त्यांनी करायचा नसून अर्धा खर्च आम्ही करू.ही सगळी बोलणी मंगेश समोरच झाली. त्यावेळी तो काही बोलला नाही. इंदिरेला जरा धाकधुक वाटत होती की मध्येच काहीतरी बोलून मंगेश बैठकीचा बेरंग करेल.पण तसं काही झालं नाही.***इंदिरा कमात मग्न असतानाच शुभांगीच्यावडलांचा फोन आला." हॅलो.झाली का लग्नाची तयारी?" इंदिरेने विचारलं."तयारी होत आली आहे.तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.""बोला.""त्यादिवशी बैठकीत तुम्ही म्हणालात लग्नाचा