चेतन घरात घुसला तेव्हाच थोडा बैचेन वाटला. मला जरा नवलच वाटलं. काय झालं असेल बरं? आत्ता एवढ्यातच तर सायकल घेऊन बाहेर गेला, तेव्हा तर चांगला हसत खिदळत होता. घटकाभरात थकून परत ही आला? जाऊ दे, असेल काहीतरी. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा कशाला उगाच बाऊ करायचा? खरं तर आपण मोठी माणसं लहान मुलांना नीट समजावूनच घेत नाही. आपण त्यांना लहान मुलं समजत राहतो आणि हेच मानून चालतो की यांच्याजवळ केवळ एक सपाट मन आहे. जेवण-खाण, खेळ आणि अभ्यास सोडून यांना कुठल्याच गोष्टीत ना काही अनुभव आहे, ना कोणती भावना, ना कोणती अपेक्षा. पण खरं तर प्रत्यक्षात असं बिलकुल नसतं. कोमल मन