बाबा ! तुम्ही माझ्यासाठी काय केले?

  • 9k
  • 1
  • 3.3k

          संध्याकाळची वेळ होती. रामराव हॉलमध्ये अध्यात्मीक पुस्तक वाचत बसले होते. त्यांची सुन मिताली किचनमध्ये स्वयंपाक करत आहे. तेवढयात ऑफीसवरून त्यांचा मुलगा धीरज घरी आला. आत येताच त्याने आपल्या हातातील बॅग जोरात बेडवर आपटली. आज तो जरा रागातच दिसत होता. रामरावांनी त्याच्याकडे पाहिले. तो त्यांना काही न बोलता फ्रेश होण्यासाठी गेला. रामराव परत आपल्या हातातील पुस्तक वाचत बसले.         थोडया वेळात धीरज किचनमध्ये येवून खुर्चीवर बसला. घरी आल्याबरोबर त्याला चहा पिण्याची सवय होती. नेहमी प्रमाणे मितालीन