जेष्ठ

  • 8.9k
  • 2.8k

जेष्ठतो पांडवांचा अखेरचा प्रवास होता.सारी राजवस्त्रे.अलंकार ,सारी सुखे त्यागून ते स्वर्गाचा मार्ग आक्रमित होते.यापूर्वीही त्यांनी अनेकदा यापेक्षा खडतर प्रवास केला होता.अगदी बालपणापासून त्यांच्या नशिबी सतत संघर्ष करणे आले होते.प्रत्येक वेळा त्या पाच जणांची वज्रमूठ एक राहिली. प्रत्येक संकटाला तोंड देत त्यांनी यशस्वीपणे आपला जीवनप्रवास चालू ठेवला. खरच! जीवनाचा मार्ग कसा असतो तेच समजत नाहीत. असंख्य गुंतागुंतीच नाव म्हणजे जीवन!एखादी रेषा शांतपणे एकटीच सरळ चालली असता..अचाक असंख्य रेषा तिला छेद देत जातात.त्या आगंतुक रेषेचा परिणाम त्या रेषेवर होणे अपरिहार्य असते.मग त्या रेषेचा मार्ग बदलतो.वाट चुकल्यागत ती भिरभिरत राहते. पांडवांच जीवन सतत अस्थिरतेच्या मार्गावरून फिरत राहिले. पदोपदी नियतीने त्यांची परीक्षा घेतली. अनेकवेळा---अचानकपणे