पिल्लं उडाली

  • 5.3k
  • 1
  • 1.8k

"गौरा, ए गौरा" अक्कांनी जरा जास्तच चढ्या आवाजात हाक मारली, “कुठे उलथली, कोण जाणे... बघावं तेव्हा हिला बाहेर पळायला हवं. जरा कामातून उसंत मिळाली की गेलीच बाहेर. आता छोट्या छोट्या कामासाठी तिच्या नावाचा घोष करीत राहायचं मी. हिला सुद्धा स्वर्ग चार बोटे उरला आहे आताशा, कोणाचं ऐकतच नाही अजिबात.” “काय झालं अक्का?” धापा टाकत गौरा ने अंगणात येत विचारलं. “कुठे बसली होतीस चकाट्या पिटत? जरा बघ बरं, या कबुतरांनी अगदी भंडावून सोडलं आहे. बहुतेक घरटे बनवीत आहेत तिथे. आधीच घर धुळीपासून स्वच्छ ठेवता ठेवता नाकी नऊ येतात आणि आता हे काड्या-काड्या आणून सगळीकडे पसरवून ठेवताहेत. जरा झाडून घे तर.” गौरा