आठवणीतली दिवाळी..

  • 7k
  • 2.3k

आठवणीतली दिवाळी..झाली पहाट गंधित उटण्याची..केली रोषणाई लाख दिव्यांची..सजली दारी तोरणे पानाफुलांची..रेखिली अंगणी नक्षी रांगोळीची.. दरवळ फराळाचा पसरे घरोघरीआकाशकंदील तो झुले दारीघेऊन आकांक्षा अन नवस्वप्ने उरीआली दिवाळी माझ्या घरी..दिवाळी म्हटलं की आठवतो उत्सव दिव्यांचा.. सगळीकडे लख्ख प्रकाश.. सुगंधी उटण्याचा सुगंध.. घरोघरी पसरणारा सुग्रास फराळांचा तिखट गोड दरवळ.. नवीन खरेदी, भेटवस्तूंची रेलचेल.. प्रचंड उत्साह संचारलेला जाणवतो.. सर्वात मोठा सण.. साऱ्या भारतभर किंबहुना भारताच्या बाहेरही साजरा होणारा सण.. दिवाळी आठवली की, आजही आपसूक मन बालपणीच्या आठवणीत रमून जातं. मुंबईतल्या चाळीतल्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि ओठांवर किंचित हसू आणि डोळ्यांत पाणी दाटून येतं. आजही दिवाळी साजरी होते पण त्या चाळीतल्या दिवाळीची सर येत