ग...गणवेशाचा - भाग २

  • 5.4k
  • 2.7k

ग…गणवेशाचा भाग २मागील भागावरून पुढे…हल्ली मुन्नीचं कशात लक्ष्य नसायचं हे तिच्या आईच्या आणि आजाच्या लक्षात आलं होतं. बाप शुद्धीवर नसायचाच तर त्याला मुन्नीत झालेला बदल कसा कळणार?मुन्नीला आता त्या मुलांच्या दप्तरात काय आहे याची उत्सुकता लागली होती. एक दिवस त्यातील एका मुलाचं दप्तर खाली पडलं. त्याने ऊचलण्या आधी ते दप्तर ऊघडल्या गेलं. दप्तरातील पुस्तकं वह्या खाली पडली. ती पुस्तकं त्या मुलाने पुन्हा आत ठेवली. मुन्नीची इच्छा पूर्ण झाली. दप्तरात वह्या पुस्तकं असतात हे कळलं. लांबुन प्रत्येक पुस्तकाचा रंग नाही कळला पण जे कळलं त्यामुळे तिचे डोळे चमकले. भान हरपून ती दप्तराकडे बघत होती. एवढ्यात कोणीतरी तिचा दंड धरल्यामुळे ती भानावर