ग...गणवेशाचा - भाग ३

  • 5.1k
  • 2.4k

ग…गणवेशाचा भाग३मागील भागावरून पुढे…दुपारचं ऊन डांबरी रस्त्याला चमकवत होतं. सामानानं गच्च भरलेला तो ठेला चढावावर चढवणं लख्याला त्रासाचं जातं होतं पण तो काय करणार?पैशाची जाणीव त्याला ठेला ओढायला सांगत होती. त्यातच काल लख्याने मिळालेले सगळे पैसे दारुत ऊडवल्यामुळे घरातले सगळेच उपाशी राहिले होते. रखमाला सारखं पैसे उधार मागणं बरोबर वाटायचं नाही.भुकेमुळेही लख्याचा ठेला ओढायला जोर लागत नव्हता. त्याच्या बरोबर त्याची दहा वर्षांची मुलगी मुन्नी होती.आज लख्याबरोबर तिच्या आईनेच तिला पाठवलं होतं मिळालेली मजूरी घरी घेऊन यायला.कारण लख्या मजुरी हातात पडली की सरळ दारूच्या गुत्त्यावर जायचा आणि अर्धे पैसे संपवूनच घरी यायचा.मुन्नीचां जीव ऊन्हानी कासाविस झालेला होता.पायातल्या चपलेला मध्येच भगदाड पडल्याने