ग...गणवेशाचा - भाग ४

  • 5.1k
  • 2.5k

ग…गणवेशाचा भाग ४मागील भागावरून पुढे…रखमाला एका शाळेचं आंगण जाण्याचं काम आहे असं कळलं तेव्हा रखमाने मुन्नीला बरोबर घेऊन जायचं ठरवलं.दोन्ही लहान मुलांना आज्याला सांभाळायला सांगीतलं." राणे तू रोजच्या कामावर कधी जाशील?"" हे साळचं काम झालं की जाईन." रखमा म्हणाली."साळेचं काम लवकर झालं नाही मंजी! त्यापेक्सा तू ऊद्या सांगून दे का परवा कामाले न्हाई येनार. तू सुट्टीचं घेत नाय कदी. एखांदी घेतली तर का होते!" रखमालापण आज्याचं म्हणणं पटलं. ती कामाला निघाली. कामावर गेलं की ऊद्या येणार नाही म्हणून सांगायचं हे तिनी मनाशी पक्कं ठरवलं.****सकाळी सकाळी रखमा आणि मुन्नी दोघी शाळेकडे निघाल्या. एवढ्या सकाळी कामाला जायचं मुन्नीच्या जीवावर आलं होतं. पण