ग...गणवेशाचा - भाग ५

  • 3.6k
  • 1.7k

ग…गणवेशाचा भाग ५मुन्नीमध्ये असलेली हुशारी, चिकाटी बघून मालकिणीने मनोमन निश्चय केला की या हि-याला चांगले पैलू पाडायचेच. तो असा मातीत हरवू द्यायचा नाही.असं होता होता दोन चार महिने निघून गेले. मुन्नीला आता अक्षर ओळख चांगली झाली होती. पाढे बिनचूक म्हणून लागली होती .गाळलेले अंक कोणते ते समजू लागलं होतं. शाळेच दार, शाळेतील वर्ग बघण्याची मुन्नीला झालेली घाई तिच्या बोलण्यातून नजरेतून मालकिणीलाच नाही तर रखमा आणि आज्यालाही दिसू लागली होती.****एकदा शाळेची तयारी करत असताना मालकिणीच्या मुलीने विचारले," आई मुन्नीला आमच्या शाळेत घेतील?"" बघू.कोणत्या वर्गात तिला घेतील हे मला माहीत नाही.जर तुमची शाळा नाही म्हणाली तर तिला काॅर्पोरेशनच्या शाळेत घालू."" काॅर्पोरेशनच्या शाळेत