रात्र खेळीते खेळ - भाग 9

  • 7.8k
  • 3.8k

अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि नक्की कोण आहे.. पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण तिलाच माहिती नव्हत... ती तर नेमक आपल्याला या स्त्रीविषयी आपलेपणा का जाणवतोय याचा विचार करत होतीच कि त्या स्त्रीने तीच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून तिला भानावर आणले.... काय ग कसला एवढा विचार करतेस.... तीच्या या प्रश्नाने अनुश्री गोंधळलीच .....न न न नाही कसला नाही... बर मला वाटत तु खूप थकली असणार आतापर्यंत ज्या संकटांना तोंड देवून आलीस त्यामुळे तु आत चल आपण थोड मोकळ होवून बोलू तसही अजून धोका टळला