पचका

(22)
  • 12.9k
  • 4.3k

पचकाsssss... कधी कधी काहींच्या विचित्र स्वभावामुळे चार चौघात त्यांची जी फजिती होते..त्याचीच कथा आहे ही पचकाss... लग्नाच्या पंगतीत किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेल्यावर तुमच्या पैकी बऱ्याच जनांनी गुलाबजामुन, रसमलाई ,रबडीवर आडवा हात मारला असेलच, काहींनी तर अगदी पोट फुटेस्तोवर... पण एवढे तर चालते हो .!..होना..? सर्वच जण करतात.. !! अगदी पन्नास रुपयाची नोट पाकिटात घालून घरातले ,आजूबाजूचे सगळे जेवतात ,हेही ठीक आहे.. पण काहींचे एवढ्यापुरतेच मर्यादित राहत नाही. ते लोकं जिथे शक्य असेल तिथे धूम करतात ...मग ते काहीही असो . आता उदाहरण द्यायचे म्हटले अश्या व्यक्ती जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात तर ..तेथे टेबलवर असणारे टिशू पेपर,शोप ..संपलीच म्हणून समजा !....