सत्यमेव जयते! - भाग ५

  • 7.3k
  • 4.1k

भाग ५. सकाळी महालक्ष्मीला शुद्ध यायला लागते. तशी ती डोक्याला पकडून हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. ती आपला हात हलवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचा हात काही हलत नाही. त्यामुळे ती जराशी उठून बसून आपला हात पाहायला लागते. तिचा नाजूक असा हात राजवीरने घट्ट धरला होता. त्यावर त्याने स्वतःचे डोकं ठेवलं होतं. त्या कारणाने तिला स्वतःचा हात हलवता आला नाही. राजवीरला अस पाहून थोडस वाईट तिला वाटतं. भरल्या डोळ्यांनी ती तिच्याही नकळत त्याच्या केसांत हात घालते. "लहान पण बरं होत ना राज. या जगात माझा होणारा नवरा सगळं काही माझं अस्तित्व मिटवून गेला. पण तू मात्र माझ्यासोबत उभा आहे. नको