ऋतू बदलत जाती... - भाग..5

  • 6.9k
  • 3.8k

ऋतू बदलत जाती.....५ "तुमचं प्रारब्ध जुळलेलंय...एकाशीच....कधी सोबत .....कधी एक एक करून...."महेशी आठवत बोलली. "आणि तेच साधू...काल घरी आले होते..."क्रिश शांभवीकडून बोलला. *** आता पुढे..... "हो काल तेच साधू आम्हाला भेटले होते.. भेटले होते म्हणण्यापेक्षा ..ते दारात अचानकच प्रगट झाले ... म्हणजे दरवाजातूनच आले ...पण अचानक .....आम्ही सुवर्णा विषयी बोलत होतो तेव्हा ..."शांभवी चे शब्द क्रिशच्या मुखातून निघत होते.एका अनुवादकाचे काम तो निट करत होता. "कोण सुवर्णा...."महेशी क्रिश ने एक दीर्घ श्वास सोडला आणि हळूहळू शांभवीच्या एक्सीडेंट ची आणि त्याच्यानंतर ची कहाणी महेशीला सांगितली. "काय ...! माझ्या शांभवी सोबत एवढं सर्व घडून गेलं... आणि मला माहितीच नाही ..."परत महेशी रडायला लागली.