पालकत्व

  • 7.2k
  • 2
  • 2.4k

ही गोष्ट आहे दोन मित्रांची अगदी तुमच्या माझ्यासारखी. धीरेन व प्रताप दोघेही अगदी लहाणपणापासून एकत्र वाढलेले, एकत्र शिकलेले. दोघांचीही गाढ मैत्री होती. दोघांचेही लग्न दोन महिण्यांच्या अंतराने झाली. दोघांनीही भागीदारीमध्ये कपडयाचा व्यवसाय चालू केला. धीरेन महत्त्वकांक्षी होता. फक्त पैसा कमावणे हाच त्याचा उद्देश होता. तर प्रताप पैसे कमावण्यासह माणुसकी जपण्याचा उद्देश ठेवून वागणारा होता. व्यवसायापुढे धीरेन आपल्या स्वत:च्या कुटुंबालाही वेळ देत नसे. तर प्रताप व्यवसायासह आपल्या कुटुंबालाही वेळ देत असे. आता धीरेन व प्रताप या दोघांनाही मुले झाली होती. आपल्या मुलासाठी पैसे कमावण्याच्या प्रयत्नात धीरेन आपल्या मुलालाही वेळ देत नव्हता. तर प्रताप आपल्या मुलांसोबत रमण्यात आनंद मानत होता. आपल्या बाळाच्या