सत्यमेव जयते! - भाग ८

  • 7.1k
  • 3.5k

भाग ८. "सगळं संपलं आहे महालक्ष्मी तुझं. स्वतःच अस आता काहीच नाही आहे माझ्याकडे. काय गुन्हा होता माझा? की माझ्यावर अशी परिस्थिती आली? मी तर फक्त माझ्या फॅमिलीचा आणि माझा विचार करून आपल्याच जगात सुखी राहण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याने माझं सुख हिरावून घेतलं. सगळं काही माझं घेतलं. आमच्यातील नात्याला देखील त्याने डाग लावला आहे." महालक्ष्मी खिडकीतून बाहेर चंद्राला पाहत मनातच रडत बोलत असते. आता ती फक्त मनात रडायची. चेहऱ्यावर काहीच हावभाव सध्या तरी तिच्या नव्हते!! कारण तिचा रडवलेला चेहरा पाहून राजवीर आणि तिच्या आई वडिलांना त्रास व्हायचा. त्यामुळे महालक्ष्मी त्यांना दुःखी न करण्यासाठी आता मनातच कोलमडून राहायचा प्रयत्न