पाहिले न मी तुला - 1

  • 12.3k
  • 6.4k

१ नवे सेमिस्टर"बदलून गेलया सारं... पिरतीचं सुटलया वारं... आल्लड भांबावलया बिल्लोरी पाखरु न्यारं... आलं मनातलं या वटामंदी..." श्या.. फालतू गाणं पियुष ने पटकन गाण बदललं. हम्म... आत्ता कसं "सो बेबी पूल मी क्लोज़र, इन दी बैक सीट ऑफ़ योर रोवर" काय ही इंग्लिश गाणी, प्रिया मनातल्या मनात पुटपुटत होती. अस म्हणत तिने गाण बंद केल. "चला माणगाव उतरणारे", कंडक्टर ची हाक आली. गाडी पंधरा मिनिटे नाष्टयाला थांबली. प्रिया गाडीतून उतरली. वातावरणात थोडी थंडी होती. झाडांना नुकतीच पालवी फुटलेली. वसंत ऋतू नुकताच बहरलेला. पियुष खेडेकर चिपळुणचा राहणारा. कॉलेजनिमित्त तो महाडला आत्याकडे राहत होता. एक सेमिस्टर संपल्याने तो सुट्टी संपून पुन्हा कॉलेजला