निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 1

  • 11.1k
  • 1
  • 5.5k

अमृतवृक्ष घाटात शोधाशोध सुरू होती. बरेच दिवस एका मुलीचा शोध चालू होता. त्या मुलीचे आई-वडीलही पुरते खचून गेले होते पण तरीही त्यांना अजूनपण आशा वाटत होती की आपली मुलगी आपल्याला नक्की सापडेल. पण रोजरोजच्या शोधान पोलिस वैतागले होते. कारण जवळजवळ दोन वर्षे झाली ते एकाच मुलीच्या शोधात गुंतले होते ‌. त्यांना वरून पण ऑर्डर येत होती कि बास झाल आता हाती काही धागादोरा पण लागत नाही आहे. याचाच अर्थ ती मुलगी जिवंत नसणार. तिने खरच आत्महत्या केली असेल. ................. ये आई बाबांना सांग ना मला पुढे शिकायच आहे. खर्च झेपत नाही म्हणून नेहमी मुलींचच का शिक्षण बंद करायच. मला पुढे